बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी वारकरी संप्रदाय मंडळ, अनगोळ यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. गुरुवार २ एप्रिल रोजी सकाळी चार वाजता हनुमान मूर्तीवर अभिषेक केले जाईल, त्यानंतर कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे कीर्तन होईल. सकाळी सहा वाजता जन्मकाळ व तीर्थप्रसादाचे वितरण, तर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भक्तांनी या धार्मिक उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रकाश माहेश्वरी आणि ट्रस्टीजनी केले आहे.