बेळगाव / प्रतिनिधी

महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे रविवारी सकाळी बेळगावात आगमन झाले. बेळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनावेळी प्रशासनाने सरकारी सन्मानाने त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल यांचे सत्कार केला.

राज्यपाल कटारियांच्या उपस्थितीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले.