- माळमारुती पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
बसवन कुडची येथे सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला माळमारुती पोलीसांनी अटक केली आणि त्याच्याजवळील धारदार तलवार जप्त केली.
अटक केलेल्या आरोपीचे नाव जिनेन्द्र पद्माप्पा चौगले (रा. शास्त्री गल्ली, बसवन कुडची, बेळगाव) आहे. मंगळवारी शास्त्री गल्ली परिसरात जेव्हा जिनेन्द्र हातात तलवार नाचवत सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करत होता, तेव्हा माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील व सहकारी त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणाची नोंद माळमारुती पोलीस ठाण्यात झाली असून तपास सुरू आहे.
त्याचप्रमाणे, मारीहाळ गावात लोकांचे पैसे मटका जुगारावर लावणाऱ्या निंगाप्पा यल्लाप्पा नेसरगी (वय ४०, रा. अंकलगी, ता. गोकाक) यालाही मारीहाळ पोलीसांनी अटक केली. आरोपी गुडदम्म मंदिराजवळ लोकांचे पैसे मटका जुगारावर लावत होता. मारीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. एम. तळवार व सहकारी धाड टाकून त्याला रंगेहात पकडले आणि जुगारासाठी लावलेले पैसे व साहित्य जप्त केले.
दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी तत्पर कारवाई करत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली असून, अधिक तपास सुरू आहे.







