• काव्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव / प्रतिनिधी

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत बाग परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला मार्च महिन्याचा काव्यवाचन कार्यक्रम जत्ती मठ येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक निळूभाऊ नार्वेकर आणि दत्ता घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला काव्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्मिता किल्लेकर यांनी सादर केलेल्या मराठी गौरव गीताने वातावरण भारावून गेले.

या काव्यवाचन सोहळ्यात २० हून अधिक कवी-कवयित्रींनी सहभाग नोंदवत विविध विषयांवर आपल्या कविता सादर केल्या. मराठी भाषा, महिला सक्षमीकरण तसेच सामाजिक विषयांवर आधारित रचनांना विशेष दाद मिळाली. किरण पाटील, निलेश शिंदे, स्मिता किल्लेकर, रोशनी हुंद्रे, स्वप्नील जोगानी, प्रतिभा सडेकर, डॉ. संजीवनी खंडागळे, स्नेहल बर्डे, अक्षता येळूरकर, अशोक सुतार, अपर्णा पाटील, गुरुनाथ किरमीटे, प्रा. शुभदा खानोलकर, माया पाटील, निळूभाऊ नार्वेकर, प्रा. ज्योतिबा नागवडेकर, डॉ. मनीषा नाडगौडा, चंद्रशेखर गायकवाड आणि दत्ता घोडके आदींनी आपल्या कवितांमधून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रा. मनीषा नाडगौडा यांनी केले. सूत्रसंचालन माया पाटील यांनी आपल्या खास शैलीत रंगतदार पद्धतीने केले, तर स्वप्नील जोगानी यांनी आभार मानले. एकूणच मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा काव्यवाचन सोहळा काव्यरसिकांसाठी साहित्यिक पर्वणी ठरला.