• शिवराज विद्या संकुल हॉलमध्ये आयोजन ; युवक-युवतींना सुवर्णसंधी

गडहिंग्लज : मराठा समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी गडहिंग्लज येथे वधू-वर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वडरगे रोडवरील शिवराज विद्या संकुल हॉल येथे हा मेळावा पार पडणार आहे.

या मेळाव्याचे आयोजन बालाजी वधू-वर सूचक केंद्र, भडकल गल्ली, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आले असून मराठा समाजातील विवाह इच्छुक तरुण-तरुणींना एकमेकांना भेटण्याची आणि योग्य जोडीदार शोधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मेळाव्यासाठी ४०० रुपये स्वागत शुल्क ठेवण्यात आले आहे. तसेच इतर सर्व जातींची नोंदणीही मेळाव्याच्या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी ९००८९६६९४१ आणि ६३६४७७५५१३ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.