बेळगाव / प्रतिनिधी
कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान शहापूर यांच्या वतीने गेली आठ वर्षे पर्यावरण पूरक फुलांची रंगपंचमी साजरी करण्याचा स्तुत्य कार्यक्रम राबविला जात आहे.
या कार्यक्रमांतर्गत आज रविवारी दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी खासबाग येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक खासबाग (रिक्षा स्टॅण्ड समोर ) येथे फुलांची रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी नगरसेवक श्री. नेताजी जाधव यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाला शहापूर पोलीस ठाण्याचे सीपीआय सीमानी यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी नगरसेवक गरसेवक विजय भोसले,गोपाळ बिर्जे, मालोजी अष्टेकर,पी,जी घाडी,श्रीधर जाधव यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ तसेच युवा आणि महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांनी बेळगावात अशा प्रकारे पर्यावरण पूरक फुलांची रंगपंचमी साजरी केली जाते याचे इतरांनीही अनुकरण करावे असे आवाहन केले.








