बेळगाव : पाईपलाईन रोड विजयनगर येथील शिवगिरी शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 वाजता रुद्राभिषेक,सकाळी 11.30 पासून महारुद्राभिषेक तर रात्री 12 वाजता नामस्मरण व यामपूजा होणार आहे. यावेळी फळांच्या रसाचा अभिषेक करण्याची संधी भाग घेणाऱ्या भक्तांना देण्यात येणार आहे. तसेच महारुद्राभिषेक प्रारंभ झाल्यापासून उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक श्री. पी. सी. कोकितकर यांनी केले आहे.