बेळगाव : मराठी सन्मान यात्रेच्या पुढील नियोजनाबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने उद्या मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठा मंदिर येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत मराठी सन्मान यात्रेच्या आगामी कार्यक्रमांची रूपरेषा, पुढील दिशा, कार्यपद्धती तसेच संघटनात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. सीमाभागातील मराठी अस्मिता, हक्क आणि एकजुटीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
तरी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी वेळेवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी केले आहे.








