बेळगाव / प्रतिनिधी

कंग्राळी खुर्द येथील ज्योतीनगरचे सुपुत्र जवान जगदीश शिंदे यांचा भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना हरियाणा राज्यातील अंबाला येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. देशसेवेचे दायित्व पार पाडत असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कंग्राळी खुर्द गावासह संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.