सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) येथील लक्ष्मी गल्लीतील नूतन जीर्णोद्धार करण्यात आलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त उद्या सोमवार दि. २ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महालक्ष्मी मंदिराच्या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे,
सोमवार दि. २ रोजी जलादिवस. वेळ संध्याकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत, मंगळवार दि. ३ रोजी धान्यदिवस, वेळ ६ ते ८ पर्यंत, दि.४ रोजी निद्रादिवस, गुरुवार दि. ५ रोजी कळस मिरवणूक सकाळपासून संपेतोपर्यंत, त्याच दिवशी राक्षगणहोम वेळ संध्या ६ ते रात्री ८ पर्यंत, शुक्रवार दि. ६ रोजी सकाळी ७ वा. संपूर्ण गावांमधील महिला आपल्या डोक्यावर कलश घेऊन मिरवणूक निघणार आहे. संपूर्ण गावांमधील देवांना जलाभिषेक व पूजन होईल. गो-माता पूजन त्यानंतर मंदिरामध्ये गो-प्रवेश होईल. तोरण बांधणे आणि वास्तूशांती आणि होम हवनविधी कार्यक्रम होतील.
- तीन दिवस गावामध्ये कटबंध वार :
शनिवार दि. ७ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून कार्यक्रम, यामध्ये मंदिराचा कळसारोहण, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्री. संभाजी भिडे गुरुजी यांच्याहस्ते होईल. मूर्ती प्रतिष्ठापना उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा, त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी असे लक्ष्मीदेवी जीर्णोद्धार कमिटीतर्फे कळविले आहे. तीन दिवस गावामध्ये कडक कटबंध वार पाळण्यात येणार आहेत.









