बेळगाव : मराठा समाजसेवा मंडळ, बेळगावच्या महिला विभागातर्फे सुवासिनींसाठी हळदी–कुंकू समारंभ शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता संस्थेच्या सभागृहात पार पडला. या समारंभात सौ. शीतल सुनील पाटील यांनी संस्थेच्या वतीने उपस्थित सुवासिनींचे मनःपूर्वक स्वागत केले. परंपरेनुसार हळदी–कुंकू लावून सुवासिनींना भेटवस्तू, तिळगूळ व अन्य वाण देण्यात आले. आनंदी आणि स्नेहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी सुशिला शिवाजी पाटील, विद्या गोविंद पाटील, कल्पना रावजी पाटील, नीता नारायण पाटील, क्षितिजा विशाल पाटील, सुमन पाटील (कोल्हापूर), कल्पना दत्तात्रय पाटील, नीना देसाई, स्मिता बंडू देसाई, छाया निंगोजी पाटील, कांचन रवळनाथ पाटील, प्रतिक्षा सावंत, माया नाईक, रेश्मा बेळगावकर, रेणुका असूकर, लक्ष्मी पोतदार, सुनीता नेसरकर, सुरेखा वसंत पाटील यांच्यासह अनेक सुवासिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चहापाण्यानंतर सौ. माया प्रशांत नाईक यांच्या आभारप्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली.