बेळगाव : येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, “भारतीय संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. देशाची प्रगती आणि एकता टिकवण्यासाठी संविधानातील मूल्यांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.” या सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये देशभक्तीपर गीते आणि नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. शिस्तबद्ध ‘पथसंचलन’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला होता.  कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.