बेळगाव / प्रतिनिधी
अतुल शिरोळे यांची मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. या स्पर्धेत बेळगावचे सिद्धांत कडली, श्रेयश हट्टीकर आणि शुभम हट्टीकर हे तीन कुस्तीपटू शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर बेळगावचे पोलीस उपायुक्त श्री. एन. व्ही. बरमणी यांनी मुख्य प्रशिक्षक अतुल शिरोळे तसेच सहभागी कुस्तीपटूंचा सत्कार करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. हा सत्कार समारंभ चेतन देसाई, महेश गुंजीकर, भावेश बिरजे, नागेश सुतार, विजय टिपण्णाचे, दुंडेश नाईक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.








