बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावचे अनुभवी आणि जनतेत विश्वासार्हता मिळवलेले पोलीस अधिकारी जे. एम. कालीमिर्ची यांनी मार्केट पोलीस निरीक्षक म्हणून अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मार्केट परिसरातील कायदा-सुव्यवस्थेची धुरा आता अनुभवी अधिकाऱ्याकडे आली आहे.
मार्केट पोलीस निरीक्षकपदावर यापूर्वी कार्यरत असलेले महंतेश धामण्णवर यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे तसेच अमली पदार्थविरोधी पथकात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले जे. एम. कालीमिर्ची यांची या पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
शासनाच्या आदेशानुसार कालीमिर्ची यांनी आज औपचारिकरीत्या मार्केट पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या अनुभवाचा फायदा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेला होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.








