बेळगाव / प्रतिनिधी

सुभाष नगर येथील आधार एज्युकेशन सोसायटी संचालित आधार पब्लिक स्कूल मध्ये शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये आधार हॉस्पिटलची वैद्यकीय तज्ञ आणि इंटर्न डॉक्टर्स सहभागी झाले होते त्यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले डॉ. चंद्रकांत पाटील आणि डॉ. जयमोहन यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले.आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांचे मार्गदर्शन लाभले होते. शिबिर संयोजनासाठी इंटर्न मुसाईब, चैत्रा, जननी, अजित विश्वेश चिमड, अनुषा, नेहा, शिल्पा, अंकुर, मुर्सल, अभिषेक, नागराज , साईकुमार, नसरीन यांनी पुढाकार घेतला होता.