बेळगाव / प्रतिनिधी
बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त 1989 च्या माजी विद्यार्थी समूहाच्या वतीने शाळेला भेटवस्तू अर्पण करण्यात आली. शालेय कामकाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या संगणकीय सामग्रीचे संच शाळेला देण्यात आले.उपेंद्र बाजीकर यांच्या नेतृत्वाखाली माजी विद्यार्थी समूहाने ही भेटवस्तू शाळेला अर्पण केली. शाळेचे मुख्याध्यापक एस. एन. जोशी यांच्याकडे ही भेटवस्तू देण्यात आली. यावेळी बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोतदार, सचिव श्रीनिवास शिवणगी, शताब्दी महोत्सव समितीचे पदाधिकारी के बी हुनगुंद, शैलजा चाटे या मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले. शाळेचे माजी विद्यार्थी सुधीर मेलगे, नितीन हुळबत्ते, गजानन गोवेकर, महेश भिसे, दिनेश शिरोळकर,भरत पोरवाल,रमेश जैन माधव पाटील, श्रीकांत हुंदळेकर, सतीश पाटील यांची उपस्थिती होती.








