बेळगाव : शिक्षण क्षेत्रात शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सव कार्यक्रमात उद्या सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता नामवंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. गुरुराज करजगी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

अकादमी ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंगचे चेअरमन डॉ. गुरुराज करजगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, विविध विषयांवरील त्यांच्या प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक व्याख्यानांसाठी ते देशभरात परिचित आहेत. बेळगावातील त्यांचे हे व्याख्यान उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे ठरण्याची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर भूषविणार आहेत. शतक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून, शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी केले आहे.