• लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित ; बेळगावहून विशेष बससेवा

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक–महाराष्ट्र सीमेवरील प्रसिद्ध श्रद्धास्थान मोहनगा दड्डी येथील नवसाला पावणारी भावेश्वरी देवीची वार्षिक यात्रा २ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भक्तिभावात पार पडणार आहे. या यात्रेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रासह विविध भागांतून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे.

यात्रा काळात भाविकांच्या सोयीसाठी बेळगाव येथून मोहनगा दड्डीकडे विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षितता, वाहतूक व मूलभूत सुविधांची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाविकांनी नियोजनपूर्वक दर्शनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.