बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील नामांकित संस्था असलेल्या मराठा युवक संघ, बेळगाव यांच्या कार्यकारी मंडळाची बैठकआज संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 60 वी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ‘बेळगाव श्री’ आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
ही स्पर्धा 27 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले असून, ती आयबीबीएफच्या नियमांनुसार विविध सात वजनी गटांमध्ये घेतली जाईल. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना सहकार्य करणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष गंगाधर एम् आणि आंतरराष्ट्रीय पंच अजित सिध्दण्णावर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांच्या हस्ते करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या बैठकीला संस्थेचे उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, खजिनदार दिनकर घोरपडे, तसेच लक्ष्मण होनगेकर, शेखर हंडे, शिवाजी हंगीरगेकर, मोहन बेळगुंदकर, सुहास किल्लेकर, श्रीकांत देसाई, नेताजी जाधव व इतर सभासद उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित संस्था असलेल्या मराठा युवक संघ, बेळगाव यांच्या कार्यकारी मंडळाची बैठकआज संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 60 वी जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ‘बेळगाव श्री’ आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
ही स्पर्धा 27 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले असून, ती आयबीबीएफच्या नियमांनुसार विविध सात वजनी गटांमध्ये घेतली जाईल. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना सहकार्य करणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष गंगाधर एम् आणि आंतरराष्ट्रीय पंच अजित सिध्दण्णावर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांच्या हस्ते करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या बैठकीला संस्थेचे उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, खजिनदार दिनकर घोरपडे, तसेच लक्ष्मण होनगेकर, शेखर हंडे, शिवाजी हंगीरगेकर, मोहन बेळगुंदकर, सुहास किल्लेकर, श्रीकांत देसाई, नेताजी जाधव व इतर सभासद उपस्थित होते.