- जलतरण क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल
बेळगाव / प्रतिनिधी
जलतरण क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजहितासाठी केलेल्या नि:स्वार्थ कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारतर्फे उमेश कलघटगी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारानिमित्त उद्योजक शिरीष गोगटे यांनी के.एल.ई. संस्थेच्या सुवर्णा जे.एन.एम.सी. जलतरण तलावास सदिच्छा भेट देत उमेश कलघटगी यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी गोगटे यांनी कलघटगी यांचे मनापासून अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या गौरवप्रसंगी सुधीर कुसाणे, नितीश कुडूचकर, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर, शिवाजी मानमोडे यांच्यासह सर्व जलतरण प्रशिक्षक, पालकवर्ग आणि मोठ्या संख्येने जलतरणपटू उपस्थित होते. जलतरण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.








