बेळगाव / प्रतिनिधी

पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवार सकाळी एक गंभीर अपघात घडला. इंडियन ऑईल कंपनीचा मोठा इंधन टँकर हुक्केरी तालुक्यातील बेनकोळी गावाजवळील घटप्रभा नदीच्या पुलाजवळ उलटला. टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या ठिकाणी काही काळ वाहतूक खोळंबा झाला.

दरम्यान, सुदैवाने टँकरमधून इंधन गळती झालेली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. स्थानिक पोलिस व क्रेनच्या मदतीने उलटलेले वाहन रस्त्याच्या कडेला हटविण्यात आले असून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.