•  व्यापारी किरकोळ जखमी 

निपाणी / प्रतिनिधी

देवगड-निपाणी राज्यमार्गावरील श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील उड्डाणपुलावर उसाच्या कांड्या भरून जाणार्‍या ट्रॉलीचा जॉईंट तुटल्याने ट्रॉली दहा फूट मागे जाऊन मुदाळतिट्ट्याकडे भाजीपाला भरून जाणार्‍या टेम्पोवर आदळली. या अपघातात टेम्पोमध्ये असणारे व्यापारी किरकोळ जखमी झाले.

या घटनेत ट्रॉली टेम्पोपासून थोडीशी मागे गेली असती, तर कठड्यावरून खाली असणार्‍या सर्व्हिस रोडवर कोसळून मोठा अपघात झाला असता. प्रत्येक रविवारी बाळूमामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते. भाविकांची वाहने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला उभी केली जातात. त्यामुळे निपाणी राधानगरी मार्गाकडे जाणार्‍या वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागते.