बेंगळुरू : बिहार निवडणुकीतील अपयशानंतर राहुल गांधींसाठी कर्नाटकमधून आनंदाची बातमी आली आहे. त्यांच्या पक्षाशी संबंधित या घडामोडीत देशात ‘मतचोरी’ प्रकरणात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून, यामुळे राहुल गांधींच्या आरोपांमध्ये कितपत सत्यता आहे हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कर्नाटकातील इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदाराचे नाव राजू आहे. त्यांनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान महादेवपुरा मतदारसंघात मतचोरी झाली असल्याचा आरोप केला आहे. तक्रारीत असेही म्हटले आहे की, मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार करून बेकायदेशीरपणे बोगस मतदारांची नावे समाविष्ट केली गेली आहेत.








