• व्यापारी वर्गात खळबळ

बेळगाव / प्रतिनिधी

शहापूर परिसरात विनापरवाना व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या आस्थापनांवर बेळगाव महापालिकेने आज सकाळी अचानक मोहिम राबवली. नाथ पै चौकाजवळील दुकाने आणि इतर व्यवसाय तपासत असताना ज्यांच्याकडे वैध परवाना नव्हता, अशांच्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.

महापालिकेची कारवाई सकाळीच सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच धांदल आणि चिंता निर्माण झाली. परवाना नसलेल्या दुकानांवर नोटिसा बजावून पुढील कार्यवाहीचा इशारा देण्यात आला असून, ही मोहीम आणखी काही भागात राबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.