सावगांव : सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, सावगाव येथे शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी बालदिनानिमित्त आणि कर्नाटक शासनाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शिक्षक – पालक महासभेचे आयोजन करण्यात आले. श्री. सागर कलाप्पा सावगावकर या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे चेअरमन डॉ. श्री. वाय. एम. पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. गणपत पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक श्री. एस. एस. गाणगी यांनी केले. यावेळी विद्यार्थिनी सौम्या हिने भारतीय संविधान प्रास्ताविक अभिवाचन करून उपस्थितांची वाहवा मिळवली. विद्यार्थ्यांनी बालदिनावरील मनोगतही व्यक्त केले.

यानंतर शिक्षक श्री. एस. एस. गाणगी आणि श्री. एस. एम. गौंडाडकर यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना तसेच विविध सरकारी उपक्रमांची सविस्तर माहिती पालकांना दिली. प्रमुख अतिथी डॉ. श्री. वाय. एम. पाटील, श्री. गणपत पाटील आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. कल्लप्पा पाटील यांनी पालकांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले आणि संस्कारक्षम पिढी घडविण्याचे आवाहन केले.

बालदिनाच्या निमित्ताने एसडीएमसी कमिटीच्या सहकार्याने उपस्थित माता-पालकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. तीन भाग्यविजेत्या मातांना साड्या भेट म्हणून प्रदान करण्यात आल्या. त्यानंतर सर्व पालकांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

सभेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक श्री. संजय गौंडाडकर यांनी केले. यावेळी उपाध्यक्षा सौ. मेघा सटवाई, प्रभारी मुख्याध्यापक आर. डी. पाटील, शिक्षक – शिक्षिका आर. एस. मोतेकर, आर. एन. कदम, आय. जे. कांबळे, एस. एन. इटगीकर, मध्यान्ह आहार कर्मचारी तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.