• तब्बल २० पदकांवर नाव कोरले

बेळगाव / प्रतिनिधी

बेंगळूर येथे पार पडलेल्या ४१ व्या राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी अतिशय झळाळीदार कामगिरी करत राज्यभरात बेळगावचा डंका वाजवला आहे. या स्पर्धेत कर्नाटकातील तब्बल ६०० पेक्षा अधिक आघाडीचे स्केटिंगपटू सहभागी झाले होते. मात्र, बेळगावच्या स्केटर्सनी दमदार खेळ सादर करत ६ सुवर्ण, ६ रौप्य आणि ८ कांस्य अशी एकूण २० पदकांची कमाई केली आहे.

  • पदक विजेते स्केटर्स पुढीलप्रमाणे :

सई पाटील २ सुवर्ण, तीर्थ पाच्यापूर २ सुवर्ण, प्रांजल पाटील १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य, आर्या कदम २ रौप्य, १ कांस्य, सत्यम पाटील १ सुवर्ण, सौरभ साळोखे १ रौप्य, २ कांस्य, अनघा जोशी १ रौप्य, १ कांस्य, जानवी तेंडूलकर १ रौप्य, १ कांस्य, अथर्व पी १ कांस्य, स्वयंम पाटील १ कांस्य.

या सर्व स्केटर्सनी केएलई सोसायटी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली. त्यांच्या या यशात डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडूलकर आणि कर्नाटका रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम यांचे प्रेरणादायी सहकार्य लाभले.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्राचा लौकिक अधिक वाढला असून पुढील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्येही या स्केटर्सकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.