बेंगळूर : शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बारावी व दहावी २०२५-२६ वार्षिक परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावी परीक्षा २८ फेब्रुवारी तर दहावी परीक्षा १८ मार्चपासून सुरु होणार आहे. कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने बुधवारी दि. ५ वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. बारावी परीक्षा २८ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत परीक्षा होणार आहे. तर दहावी परीक्षा १८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत होणार आहे. या परीक्षेसाठी सकाळी १० ते दुपारी १.१५ अशी वेळ असेल. बारावी परीक्षा-२ २५ एप्रिल ते ९ मे पर्यंत होणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सोपे होणार आहे.
January 22, 2026
बेळगाव : कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट, घटप्रभा येथील प्राध्यापिका वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांनी “कर्नाटकातील निवडक रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या उच्च रक्तदाबग्रस्त रुग्णांमध्ये जीवनशैलीतील बदलांचे परिणाम” […]








