- 2,85000 रुपयांची पारितोषिके दिली जाणार
 
बेळगाव : बेळगाव नगरीत दोन दिवशीय एपीजे अब्दुल कलाम ट्रॉफी- सिझन-१ ‘ऑल इंडिया ओपन कॅरम टूर्नामेंट’चे आयोजन करण्यात आले आहे. ही कॅरम स्पर्धा आरटीओ नजीकच्या एलआयसी कार्यालयासमोरच्या डॉ. जे.टी. सीमन्ड्स हॉल (कित्तूर चन्नम्मा मार्ग) बेळगाव येथे मंगळवार दि. ४ नोव्हेंबर आणि बुधवार दि. ५ नोव्हेंबर अशी दोन दिवस चालणार आहे.
ही स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते अझीम एस.पटवेगार यांनी पुरस्कृत केली असून स्पर्धकांना एकूण २ लाख ८५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
कॅरम डबल बेस, कॅरम सिंगल बेस आणि थंब कॅरम सिंगल अशा तीन प्रकारात ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.
कॅरम डबल बेसच्या विजेत्या स्पर्धकाला ५० हजार रुपये तर उपविजेत्याला ३० हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला २० हजार रुपये आणि चौथ्या क्रमांकाच्या विजेत्याला १० हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
कॅरम सिंगल बेसमधील विजेत्या स्पर्धकाला २५ हजार रुपये तर उपविजेत्याला १५ हजार रुपयांचे तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला १० हजार रुपये तर चौथ्या क्रमांकाच्या विजेत्याला ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
थंब कॅरम सिंगल स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला ५० हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ३० हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला २० हजार रुपये तर चौथ्या क्रमांकाच्या विजेत्याला १० हजार रुपये तसेच पाचव्या ते आठव्या क्रमांकांच्या विजेत्यांना प्रत्येकी २५०० रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
कॅरम डबल बेससाठी ८०० रुपये , कॅरम सिंगल बेससाठी ५०० रुपये तर थंब कॅरम सिंगलसाठी ६०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी स्पर्धा आयोजक गिरीश बाचीकर. मो. क्र : ८०५०१६०८३४, सचिव शहाबाज सानवाले. मो. क्र : ९६१११००६७४, इरफान हुदली. मो. क्र : ९९६४३५८२५९ अथवा अब्बास नदाफ. मो. क्र : ८४९७००३१४७ यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

        

            




