बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्य चॅम्पियनशिप आणि सीबीएसई दक्षिण विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या उल्लेखनीय कामगिरीने शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
बॉक्सिंग स्पर्धेत भूमिका किरोजी आणि गणेश कांबळे यांनी सुवर्णपदक, तर वृतिका कोळुरमठ, इव्हॅन्जेलिन डिसोझा आणि मोहम्मद नुमान यांनी रौप्यपदक पटकावले. नैतिक भाटी याने कांस्यपदक जिंकत यशस्वी ठरला.
स्केटिंगमध्ये सौरभ साळुंखे याने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक, तर अनघा जोशी हिने रौप्यपदक मिळवले आहे.
या विजेत्यांपैकी भूमिका किरोजी, वृतिका कोळुरमठ, इव्हॅन्जेलिन डिसोझा आणि मोहम्मद नुमान यांची ४ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये होणाऱ्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झाली असून ते बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. दरम्यान, स्केटिंग खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चंदीगड येथे भाग घेणार आहेत.








