• सुदैवाने जीवितहानी टळली 

बेळगाव / प्रतिनिधी

बागेवाडीहून बेळगावकडे निघालेला एक १६ चाकी कंटेनर गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास पलटी झाला. ही घटना हलगा येथील बालाजी काँक्रेट समोरच्या महामार्गावर घडली.

सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या कंटेनरचा चालक व क्लिनर गाडी सोडून पळून गेले आहेत, आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.