बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे आयोजित वार्षिक कुस्ती आखाडा येत्या ४ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. या पारंपरिक कुस्ती आखाड्याच्या तयारी संदर्भात झालेली महत्त्वपूर्ण बैठक मारुती घाडी यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.
बैठकीचे अध्यक्षस्थान वैभव खाडे यांनी भूषवले. संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सलग पंधराव्या वर्षी हा आखाडा आयोजित केला जात असून, कुस्ती क्षेत्रातील नामांकित पैलवानांच्या झुंजी होणार आहेत.
बैठकीत महादेव पाटील (धामणे) यांची एकमताने संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी वैभव खाडे, अशोक हलगेकर, हिरालाल चव्हाण आणि वाय. पी. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
हा कुस्ती आखाडा माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंदवाडी येथील मैदानावर कुस्त्या रंगणार आहेत.
बैठकीला संस्थेचे अध्यक्ष मारुती (घाडी), उपाध्यक्ष महादेव पाटील (धामणे), सचिव संतोष होंगल, हिरालाल चव्हाण, अशोक हलगेकर, वैभव खाडे, वाय. पी. नाईक, सुरंदर देसाई,भरमा पुंजीगौडा, संजय चौगुले, मल्लाप्पा हिंडलगेकर, मनोहर गावडे, भोमेश बिर्जे, भरमाणा हलगेकर, मारुती नाईक (वडगाव), मोनाप्पा मोरे (कावळेवाडी) आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष होंगल यांनी आभार मानले.