- राज्योत्सव शांततेत पार पाडण्याचे निर्देश
बेळगाव / प्रतिनिधी
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यंदाच्या कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी ‘काळा दिन’ पाळण्यास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले. राज्योत्सवाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मते, “राज्योत्सव हा ऐक्य, सौहार्द आणि सकारात्मकतेचा दिवस आहे. या दिवशी कोणत्याही राज्यविरोधी किंवा वादग्रस्त कार्यक्रमाला स्थान नाही.” त्यांनी सांगितले की, कर्नाटकशी संबंधित संघटना व जिल्हा प्रशासन यांच्यात लवकरच बैठक घेऊन उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात येईल.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, हा दिवस सकारात्मक वातावरणात, ऐक्य व आनंदाने साजरा करा, आणि कोणत्याही प्रकारच्या वादग्रस्त हालचालीवर कडक कारवाई होईल.
बैठकीत जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, पोलीस खात्याचे अधिकारी आणि विविध कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.