बेळगांव : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. या निंद्य प्रकाराचा निषेध करण्यासाठी प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कुबेर कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे ही सभा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.
March 10, 2026
केंद्र सरकारविरोधात निदर्शने बेळगाव / प्रतिनिधी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. महिला दिनाच्या दिवशीच दरवाढ जाहीर केल्याने […]








