• शिक्षण क्षेत्रात पाऊल

बेळगाव / प्रतिनिधी

रुग्णसेवेतील जलद प्रगतीसह प्रसिद्ध झालेल्या अरिहंत हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने आता वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसकडून अलाईड कोर्सेस, डीएमएलटी आणि फिजिओथेरपी अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे.

कणबर्गी रस्त्यावर, रामतीर्थ नगर येथील दयानंद आर्केडमध्ये या महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असून, प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे, असे हॉस्पिटलचे एमडी व सीईओ डॉ. एम.डी. दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अलाईड कोर्सेसमध्ये कार्डियाक केअर ट्रिटमेंट (ईको टेक्निशियन), ओटी व ॲनेस्थेशिया, तसेच डीएमएलटी (लॅबोरेटरी टेक्निशियन) अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कार्डियाक केअर ट्रिटमेंट व ॲनेस्थेशिया कोर्ससाठी प्रत्येकी २० विद्यार्थी प्रवेशासाठी मंजूर झाले आहेत. यासोबतच नर्सिंग कोर्ससाठी ६० जागा आणि फिजिओथेरपीसाठी ४० जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उच्चशिक्षित प्राध्यापकांची नियुक्ती केली जाईल, तसेच अनुभवी सहाय्यक कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात येणार आहे, असे डॉ. दीक्षित यांनी स्पष्ट केले.