बेळगाव / प्रतिनिधी

ऐतिहासिक परंपरा असलेला बेळगावचा दसरा उत्सव यावर्षी २ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले.

शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा यंदाही मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या माध्यमातून व शासनाच्या सहकार्याने नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडला जाणार आहे.

आमंत्रणप्रसंगी महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, अंकुश केसरकर, लक्ष्मण किल्लेकर, बाळू जोशी, आनंद पाटील, श्रीकांत कदम, सुरज कडूचकर, सचिन केळवेकर व शेखर तलवार उपस्थित होते.