नवरात्री २०२५ : नवरात्रीचा उत्सव हा चैतन्यपूर्ण रंगांचा जल्लोष असतो आणि तो या उत्सवाच्या आरास, पोशाख आणि रांगोळ्यांमध्ये आपल्या सभोवती दिसून येतो. या नवरात्रीच्या रंगांचे काय वैशिष्ठ्य आहे याबाबत नवल वाटले नां? आपले डोळे दिपवून टाकणाऱ्या या रंगांच्या मागे एक परंपरा, एक संस्कृती आहे. दुर्गा देवीची नऊ रूपे नऊ रंगांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे.

  • शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ : पाचवी माळ
  • आजचा रंग : हिरवा
  • रंगाचे महत्त्व : हिरवा रंग हा प्रेमाचा रंग म्हणुन ओळखला जातो. हिरवा रंग हा हिरवळीचे,समृदधीचे तसेच भरभराटीचे प्रतीक देखील मानले जाते.तसेच पाहायला गेले तर हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे.कारण ह्या पृथ्वीवरील झाडे – झुडपे, वृक्ष, इत्यादी सर्व निसर्गाची संपदा ही हिरव्या रंगातच असलेली दिसुन येते. हिरवा रंग हा आपल्या मनात प्रफुल्लितता,शांतता,आनंद निर्माण करण्याचे कार्य करतो.