बेळगाव / प्रतिनिधी
युवराज कदम यांची मलप्रभा–घटप्रभा प्रकल्प कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (काडा) च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या शिफारशीवरून राज्य प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी जारी केलेल्या आदेशाद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
युवराज कदम यांना यापूर्वी बुडाचे अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा फायदा काडाच्या विकासकामांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.