बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात मालमत्तेच्या वादातून एका महिलेचा खून करण्यात आला आहे. टिळकवाडी, मंगळवार पेठ येथे आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. गीता रणजीत दावले गवळी (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार गीता हीचा दीर गणेश गवळी याने चाकूचे सपासप वार करून तिची हत्या केली. या घटनेनंतर टिळकवाडी पोलिसांनी गणेश गवळी याला तात्काळ अटक केली आहे. मृत गीता यांचा मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे टिळकवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.