येळ्ळूर : येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेत ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर माजी सैनिक श्री. शिवाजी जोतिबा नांदुरकर यांच्याहस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन तसेच माजी सैनिक श्री. शंकर टक्केकर यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर ध्वजस्तंभ पूजन एसडीएमसी सदस्य श्री. मारुती कृष्णा यळगुकर यांच्याहस्ते करण्यात आले.
नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र चलवादी यांच्याहस्ते श्रीफळ वाढविले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे एसडीएमसी उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मानवंदना करुन गावांमध्ये प्रभातफेरी काढून शाळेमध्ये मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर शाळेमध्ये मुलांची देशभक्तीपर भाषणे व ग्रुप डान्स घेण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी श्री. महेश होनुले यांनी जुन्या व आताच्या नवीन शाळेच्या इमारतीचे छायाचित्रे काढून फेम करून शाळेला भेट दिले.
यावेळी शाळेचे एसडीएमसी सदस्य श्री. मुर्तीकुमार माने, श्री. चांगदेव मुरकुटे, श्री. दिनेश लोहार, श्री. शशिकांत पाटील, श्री. जोतिबा पाटील, श्री विजय धामणेकर,सौ दिव्या कुंडेकर, सौ. अलका कुंडेकर, सौ. प्रियंका सांबरेकर, सौ. माधुरी कुगजी, सौ. रेश्मा काकतकर, सौ. राजश्री सुतार, श्रीमती. शुभांगी मुतगेकर व शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका श्रीमती. एम. एस. मंडोळकर यांनी केले तर आभार श्री. सातेरी पाखरे मानले.