- श्वसनाचा त्रास आणि अतिसाराच्या बाबतीत चाचणी अनिवार्य
बेंगळूर : राज्यातील ३५ जणांना कोरोना संसर्ग झाला असून श्वसनाचा त्रास आणि अतिसाराच्या बाबतीत कोविड चाचणी अनिवार्य असल्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी शनिवारी सांगितले. आरोग्य विभागाने या संदर्भात आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्यात कोरोना विषाणूच्या साथीची भीती वाढत आहे. गेल्या एका आठवड्यात कोविड-पॉझिटिव्ह प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. एकूण ३५ जणांना कोविडची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यापैकी ३२ जण बंगळुरूमध्येच पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली.
आज बेंगळूर शहरात प्रसारमाध्यमांशी बोलतना ते पुढे म्हणाले, वाढत्या कोरोना संसर्गामुळे जनतेने काळजी करण्याची गरज नाही. आरोग्य विभागाने या संदर्भात आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, असे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी कोविड तांत्रिक समितीची बैठक झाली आणि राज्यात आढळलेल्या कोरोना प्रकरणांवर चर्चा झाली. आम्ही खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. आम्ही केंद्र सरकारच्याही संपर्कात आहोत. देशात एकूण २५७ प्रकरणांची नोंद झाली आहे. ज्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्हआली असून त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्याव्यतिरिक्त, कोणतीही गंभीर समस्या आढळली नाही. श्वसनाच्या समस्या आणि अतिसारच्या रुग्णांना कोविड चाचणी अनिवार्य असल्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. दिनेश गुंडूराव म्हणाले की, श्वसनाचा त्रास आणि हृदयरोग असलेल्या लोकांना दाखल असलेल्या रुग्णालयांमध्ये नमुने गोळा करण्याचा आणि अनिवार्य कोविड चाचण्या करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बाळंतिणींना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कोणीही घाबरण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
कोविडबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खबरदारी घेणे पुरेसे आहे. सर्वांसाठी मास्क ताबडतोब अनिवार्य केलेले नाहीत. स्तनपान देणाऱ्या आणि गर्भवती महिलांनी ते घालावे अशी सूचना केली जात आहे. स्वच्छता राखणे आणि चांगले सॅनिटायझर वापरणे. जनतेला प्रवास करण्यास कोणताही अडथळा नाही. प्रत्येकजण सामान्य जीवन जगू शकतो. माध्यमांनी दहशत निर्माण करू नये तर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम करावे, असे आवाहन मंत्री दिनेशगुंडूराव यांनी केले.
महिनाभर पुरेशा चाचणी किट ठेवण्याची शिफारस केली जाते. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच चाचणी केली जाईल. बेंगळुरूमध्ये ३२ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, गेल्या आठवड्यात ही थोडीशी वाढ आहे. प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले जात आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की, सध्या कोविडबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.








