हलशी : गोधोळी गावचे सुपुत्र तसेच ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आणि खानापूर-बेळगाव मित्रमंडळ, पुणेचे सचिव शिवाजी जळगेकर यांनी अभिमानास्पद यश संपादन केले आहे. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथे आयोजित दीक्षांत समारंभात त्यांना एम.टेक. (मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) या शाखेत कुलपती सुवर्णपदक आणि टॉपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष मंत्री मंगलप्रभात लोढा, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, तसेच विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. बी. मुजुमदार आणि कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.