खानापूर / प्रतिनिधी
खानापूर शहराच्या बहारगल्लीतील एका १७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.रोहन हेब्बाळी (वय १७ रा.बहारगल्ली, ता. खानापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळताचं त्यांनी तात्काळ रोहनला खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. खानापूर पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याप्रकरणी खानापूर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.