• बहीण गंभीर जखमी

रायबाग / वार्ताहर

शाळा सुटल्यानंतर पायी घरी जात असलेल्या दोन सख्ख्या बहिणींना भरधाव कारने धडक दिल्याने एकीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रायबाग तालुक्यातील मखळी गावाजवळ घडली.

या अपघातात जयश्री कोटरे (वय ११) हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिची बहीण भाग्यश्री गंभीर जखमी झाली आहे. दोघी बहिणी मखळी येथील अनुदानित सरकारी शाळेत शिक्षण घेत होत्या. जखमी विद्यार्थिनीला तातडीने बेळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागरमुन्नोळी गावाकडून रायबागकडे येणाऱ्या कारने या दोघींना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसरगी आणि रायबागचे सीपीआय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला असून, पुढील तपास सुरू आहे.