- बागलकोट येथील घटना
बागलकोट / वार्ताहर
प्रसूतीनंतर एक महिला आपल्या नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून गायब झाली. मुलगी झाल्याने तिने हे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बागलकोटमधील एका खासगी रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने प्रसूतीनंतर मुलगी झाल्याचे समजताच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला ओपीडी कार्ड बनवण्यासाठी आणि नोंदणीसाठी सांगितले. त्याचवेळी सदर महिला अचानक गायब झाली.
महिलेने मुलगी असल्यामुळे तिला स्वीकारण्यास नकार दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एक दिवस रुग्णालय प्रशासनाने तिच्या नातेवाईकांची वाट पाहिली. पण कोणीही मुलीला घ्यायला न आल्यामुळे, रुग्णालय प्रशासनाने तात्काळ सर्च अडॉप्शन सेंटरला माहिती दिली. त्यानंतर नवजात मुलीला जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू विभागात दाखल करण्यात आले. सध्या नवनगरमधील जिल्हा रुग्णालयात नवजात शिशुवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ. रजनी पाटील यांनी दिली आहे.








