कित्तूर / वार्ताहर 

पोलिसांनी दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या पायात गोळी झाडली. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर शहराच्या बाहेरील भागात आज शनिवारी सकाळी सकाळी ६ वाजता आरोपी रमेश किल्लार याला अटक करण्यासाठी जात असताना ही घटना घडली.

आरोपीने पोलीस हवालदार शरीफ दफेदार यांना चाकूने मारहाण करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या आरोपीला हवेत गोळी झाडून पळून न जाण्याचा इशारा पीएसआय प्रवीण गोंगोली यांनी दिला.परंतु पोलिसांच्या इशाऱ्याला न जुमानता आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी झाडलेली गोळी त्याच्या पायात लागली.जखमी आरोपीला बेळगावच्या बिम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही घटना कित्तूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.