• पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांचाही खात्मा

श्रीनगर : जम्मू – काश्मीरच्या श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दहशतवादी कट उधळून लावला आहे. आज सोमवार (दि. २८ जुलै) रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे.या हल्ल्याबाबत प्राप्त माहितीनुसार भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पहलगाम हल्ल्यातील सुलेमान आणि यासीर दोन दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे दहशतवाद्यांच्या विरोधातराबवलेल्या या मोहिमेला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन महादेव’ असे नाव दिले होते. दरम्यान लष्कराच्या ‘चिनार कॉर्प्स’ने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ही माहिती शेअर केली. एकीकडे लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर आज (२८ जुलै ) आज आणि उद्या विशेष चर्चा सुरु आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून या चर्चेला सुरुवात झाली असताना ही बातमी समोर आली आहे.