बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि विजया क्रिकेट अकॅडमी व हुबळी क्रिकेट अकादमी यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनीकांत शिवानंद बुकीटगार याची कर्नाटक संघाच्या उप कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. विनू मंकड करंडक देहरादून येथे ९ ते १७ ऑक्टोबर यादरम्यान खेळवण्यात येणार आहे. मनीकांत याने गतवर्षी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठांच्या क्रिकेट स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करत लक्ष वेधून घेतले होते. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यस्तरीय १९ वर्षाखालील विभागीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती या दोन्ही स्पर्धेचा विचार करून निवड समितीने त्याला उपकर्णधारपद सुपविले आहे.

मनीकांत हा शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध उजव्या हाताने फलंदाजी करत असून उजव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करत आहे. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा उत्तम दर्जाचे त्यांनी केले आहे. बेळगावचे ज्येष्ठ प्रशिक्षक रविशंकर मालशेट आणि रणजी क्रिकेटपटू मिलिंद चव्हाण यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. या स्पर्धेसाठी भारताचे महान फलंदाज व प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय याची कर्नाटक संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

कर्नाटक संघ पुढीलप्रमाणे : कर्णधार अन्वय द्रविड, नितिश आर्या, आदेश अर्ज, उपकर्णधार मनीकांत बुकिटगार, प्रणित शेट्टी, वासव वेंकटेश, अक्षत प्रभाकर, वैभव सी, कुलदीप सिंग पुरोहित, रतन बी आर, वैभव शर्मा, तेजस के ए, अथर्व मालविया, सनी कंची, एसटी रक्षक रेहन मोहम्मद. संघ प्रशिक्षक के बी पवन, गोलंदाजी प्रशिक्षक एस एल अक्षय, मॅनेजर एस ए सतीश, फिजीओ जोबी मॅथ्यू.