खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीवरील पुलाखाली आज सकाळी सुमारे ६५ ते ७० वर्षे वयोगटातील एका अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

हा मृतदेह खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मलप्रभा पुलाखाली दिसून आला. सदर महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून, तिचे वय अंदाजे सत्तर वर्षांच्या आसपास असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे कारण व इतर तपशीलांबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

या अज्ञात वृद्ध महिलेबाबत कोणालाही माहिती असल्यास किंवा ती कोणाची नातेवाईक असल्याचे आढळून आल्यास, त्यांनी तातडीने खानापूर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल बसवराज तेगूर यांच्याशी ७९९६७३८९५६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.