मुंबई : कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला आणि महाराष्ट्र केसरीचा मानकरी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करीशी संबंधित प्रकरणात अटक केली आहे.
पंजाब सीआयए पथकाने पपला गुर्जर टोळीपर्यंत शस्त्र पोहोचवणाऱ्या नेटवर्कचा भंडाफोड करत चार व्यक्तींना ताब्यात घेतले असून, या चौघांपैकी शेखचा समावेश असल्याचे पोलिसांनी पुष्टी केले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयितांकडून जवळपास 1.99 लाख रुपये रोख, 0.45 बोरचे एक पिस्तूल,
0.32 बोरची चार पिस्तुले, मोठ्या प्रमाणात काडतुसे, तसेच स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या.
याप्रकरणी खरड (पंजाब) येथील पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या सर्व आरोपींची पुढील चौकशी सुरू आहे.







