गोकाक / वार्ताहर
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आणि बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हुक्केरी तालुक्यातील हिडकल आणि शिरूर ही धरणे भरली आहेत. त्यामुळे, घटप्रभा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीतील पाण्याच्या पातळीव झाल्याने, गोकाक शहराबाहेरील लोळसूर गावाजवळ असलेला पूल पाण्याखाली गेला आहे.
हा पूल संकेश्वर आणि सौंदत्तीला जोडणाऱ्या राज्य महामार्गावर आहे. पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक थांबली असून, लोकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.